असा होता आठवडा (दि.१६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी )
दि. 16 फेब्रुवारी 20 20 - डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा , राज्यपाल राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न. कृषिमंत्री श्री दादाजी भुसे , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत उपस्थित. - नाशिक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत , महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे आयोजित वकील परिषद 2020 अंतर्गत ‘ जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेने ’, या विषयावरील चर्चासत्र संपन्न. परिवहन मंत्री श्री अनिल परब उपस्थित. श्री ठाकरे यांच्याद्वारे यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण. महत्वाचे मुद्दे- ब्रिटीशकालीन कायद्यात गरजेनुसार बदल आवश्यक , महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणे फास्ट्र ट्रॅक कोर्टकडे वर्ग करण्याची गरज भासू नये , अशी न्यायव्यवस्था आणि समाज घडविण्याची सर्वांची जबाबदारी , कायद्यापेक्षा संस्कारांना जास्त महत्व , न्यायव्यवस्था , शासन आणि प्रशासनात समन्वय आवश्यक , जिल्हा न्यायालयाच्या इमारत उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार न...