Posts

Showing posts from January, 2020

असा होता आठवडा (दि. १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२०)

Image
गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा ( न्यूज डायजेस्ट ) दि . 19 जानेवारी 2020 ·       राज्यपाल श्री . भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 17 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन . 55 हजार स्पर्धकांचा सहभाग . ·       मुख्यमंत्री श्री . उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ‘ ड्रीम रन ’ स्पर्धेचे उद्घाटन . ·         पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपमुख्यमंत्री श्री . अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ . ·       बृहन्मुंबई पोलीस दलात 88 वर्षांनी अश्वदळाचा (माऊंटेड पोलीस युनिट) समावेश . 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहनाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार असल्याचे गृहमंत्री श्री . अनिल देशमुख यां ची माहिती . ·       सन 2020 च्या हज यात्रेसाठीची संगणकीय सोडत (लॉटरी) अल्पसंख्याक मंत्री श्री . नवाब मलिक यांच्या उपस्थितीत जाहीर...