Posts

असा होता आठवडा (दि. १ ते ७ मार्च, २०२०)

Image
गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा   ( न्यूज डायजेस्ट ) दि . 1   मार्च , 2020 ·        मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत , म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग ,   स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या   3   हजार   894   सदनिकांची सोडत संपन्न. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड उपस्थित. ·        नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह , राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण    नसल्याची    आरोग्यमंत्री    श्री.    राजेश टोपे यांची माहिती. ०००० दि . 2   मार्च , 2020 ·        आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ....